तिएनशान
तिएनशान : चीन व रशियातील तुर्कस्तानचे प्रदेश वेगळे करणारी ईशान्य–नैर्ऋत्य दिशेने सु. २,४०० किमी. पसरलेली, हिमालयासारखीच वली पर्वतांची ही अर्वाचीन रांग असून सरासरी उंची ५,७९० मी. आहे. खानतेंग्री हे शिखर ७,०१० मी. व पोबेडा हे शिखर ७,४३६ मी. उंच आहे.